वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाची स्थापना २00७ साली करण्यात आली. विद्यापीठ परिसरातील, मराठी विभागातून त्याचे कामकाज सुरू होते. डाॅ. अक्षयकुमार काळे, यांच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. २0१५ मध्ये त्यांच्या नियत वयोमानानूसार ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या विभागाचाप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार डाॅ. प्रमोद मुनघाटे यांच्याकडे सोपविण्यात आला. १२ ऑक्टोबर २0१७ रोजी डाॅ. प्रदीप विटाळकर यांची निवड समितीतर्फे रितसर अध्यासनप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनासाठी ग्रामगीता भवनाची निर्मिती व उद्घाटन दिनांक १५ डिसेंबर २0१५ रोजी मा. श्री. चे. विद्यासागर राव, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि विद्यापीठाचे कुलपती, यांच्या शुभहस्ते, डाॅ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, यांच्या अध्यक्षतेखाली, डाॅ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.